डिसॅबिलिटी प्राईड /अपंगत्वाचा गर्व

डिसॅबिलिटी प्राईड /अपंगत्वाचा गर्व

डिसॅबिलिटी प्राईड किंवा ज्याचे आपण अपंगत्वाचा गर्व असे मराठीमध्ये भाषांतर करू ही संकल्पना आपल्यासाठी, भारतामध्ये, आगळी वेगळी तशीच नवीन सुद्धा आहे.कारण आपल्याकडे अपंगत्वाकडे नेहमीच एक न्यूनता म्हणूनच बघितले जाते . त्याच्यात अपूर्णत्वाची भावना असते.असे असताना त्याविषयीचा गर्व बाळगणे आणि जोपासणे तर दूरची गोष्ट! 

जरी आता अपंगत्व आणि त्याविषयीची आपली मते, आपले विचार काळानुसार बदलत आहेत, परिपक्व होत आहेत तरी आपल्यासाठी भारतामध्ये हि संकल्पना नवीनच आहे. डिसॅबिलिटी प्राईड/अपंगत्वाचा गर्व ह्या संकल्पनेने अपंगत्वाच्या वेगवेगळ्या विचारधारा आणि प्रवाहांमधून वाहत जाऊन आकार घेतला आहे . 

सुरुवातीला आपण ह्या विषयाकडे तसेच अपंग/दिव्यांग व्यक्तींकडे फक्त परोपकाराच्या किंवा दान धर्माच्या दृष्टीने बघायचो.कीव, कणव, दया हीच भावना सबळ असायची.त्यात काही गैर वाटायचे नाही.पण आता आपले विचार प्रगतीशील बनले आहेत.व्यक्तींचे हक्क आणि तीचे अधिकार मूलभूत मानले जातात.

अशा पार्श्वभूमीवर अपंगत्व म्हणजे काय ते वास्तविक स्वरूपात समजून घेऊन त्याला एक योग्य ते स्थान आणि सन्मान देण्यासाठी, तसेच त्याला एक मूर्त स्वरूपात प्रायोजन देण्यासाठी जुलै महिना ठरवला गेला आहे.

अपंगत्वाविषयी आतापर्यंत झालेले कार्य, इतिहास , अपंग व्यक्तींची जीवन गाथा, त्यांच्या व्यथा, यांची धडपड, सन्मानाने उभे राहण्याची जिद्द ह्या सर्व गोष्टीची आठवण म्हणून जुलै महिना भर कार्यक्रम साजरे होतात. 

आपणही ह्या गर्व म्हणा किंवा गौरव यात्रेत सामील होऊया!

Leave a comment